E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
पुणे : पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या महिन्यात डेंग्यूचे एकूण ३८९ संशयित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर चिकुनगुनियाचेही ८ रुग्ण आढळून आले आहेत. तर झिकाची रुग्णसंख्या ४४ वर पोहोचली आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे ३८९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ११ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. गेल्या महिन्यात संशयित रुग्णांची संख्या १५७ होती आणि निदान झालेला केवळ १ रुग्ण होता. जानेवारी ते मे या कालावधीत दरमहा संशयित रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी होती. जानेवारी ९६, फेब्रुवारी ७५, मार्च ६४, एप्रिल ५१ आणि मे ४४ अशी रुग्णसंख्या होती. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून मोठी वाढ झालेली आहे. शहरात या वर्षभरात डेंग्यूचे ८७६ संशयित रुग्ण आढळले असून, निदान झालेले २१ रुग्ण आहेत. यंदा शहरात चिकुनगुनियाचे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यात फेब्रुवारी ५, मार्च ४, जून १ आणि आता जुलैमध्ये ८ रुग्ण आढळले आहेत. शहरात हिवतापाचा यंदा एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहेत. पावसाळ्यातील डासांमुळे पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्याचे काम सुरू आहे. यंदा डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी १ हजार १७४ घरमालकांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून ४ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
झिकाची रुग्णसंख्या ४४ वर
शहरातील झिकाची रुग्णसंख्या ४४ वर पोहोचली आहे. त्यात एरंडवणे आणि डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुंढवा ४, पाषाण ४, खराडी ३, आंबेगाव बुद्रुक, कळस, सुखसागरनगर, घोले रस्ता प्रत्येकी २, लोहगाव आणि धनकवडी प्रत्येकी १ अशी एकूण ३७ रुग्णसंख्या आहे. त्यातील १३ गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
Related
Articles
लांडग्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी
04 Sep 2024
बलात्कार करणार्यांना आता फाशी
04 Sep 2024
सिमरन शर्माला कांस्यपदक
09 Sep 2024
आयआयटीच्या संकुलाचे उद्घाटन
04 Sep 2024
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
10 Sep 2024
‘घाशीराम’मधील गणपती श्रीकांत गद्रे यांचे निधन
06 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)