E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पाणी उकळून प्यावे
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
महापालिकेचे आवाहन
पुणे : पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर आला होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असण्याची शयता आहे. दूषित पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
पावसाच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते. हे पाणी प्यायल्यास अतिसार, थंडी, ताप यांसारखा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणे दिसून आल्यास आशा सेविका, परिचारिका, आरोग्य सेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावेत. तसेच नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा. जुलाब आणि अतिसारात जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा जलसंजीवनीचा (साखर, मीठ, पाणी) वापर करावा. जुलाब, अतिसार, काविळची साथ असल्यास पिण्याच्या पाण्यात लोरीन लिक्विड टाकूनच प्यावे, असे आरोग्यनागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टायांची साफसफाई करून घ्यावी. नळ गळती, व्हॉल्व गळती असेल, तर दुरुस्त करून टाकीभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे आणि ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये. आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून धुवून, पुसून आणि कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळ्या पाण्यामधे होऊ देऊ नयेत. साथीचे आजार बळावल्यास महापालिकेच्या दवाखान्यांतील डॉकटरांना दाखवावे, असेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे. विभागाने म्हटले आहे.
Related
Articles
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या ४१ नागरिकांचा मृत्यू
04 Sep 2024
उमर अब्दुल्ला यांचा उमेदवारी अर्ज दाखल
05 Sep 2024
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10 Sep 2024
तिजोरी रिकामी होत आहे...
08 Sep 2024
रशिया-युक्रेन युद्ध भारत थांबवू शकतो : मेलोनी
09 Sep 2024
बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले
09 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)