पुण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता   

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज 

पुणे : सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. शहरात रविवारी सकाळपासूनच हलया स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. आज सोमवारी पुण्यात हलया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शयता आहे. यासह जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात मंगळवारपर्यंत उत्तरेकडील भाग, मध्य आणि दक्षिण भागावर कमी हवेचा दाब राहणार आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात विस्तृत स्वरूपात मुसळधार पावसाची शयता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बर्‍यापैकी विस्तृत स्वरूपात पावसाची शयता राहणार आहे. बुधवारपासून तुरळक ठिकाणी हलया ते मध्यम पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे.
 
बुधवारपासून आठवडा अखेरपर्यंत राज्याच्या उत्तरेकडील भाग आणि दक्षिण भागावर अधिक प्रमाणात हवेचे दाब निर्माण होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर काही प्रमाणात  पावसाची उघडीप स्थिती निर्माण होईल. राज्यातील सर्वच भागात वार्‍याचा ताशी वेग वाढेल. सांगली, सोलापूर, नगर, वर्धा, यवतमाळ, बीड, धाराशिव, लातूर या सर्व जिल्ह्यांत वार्‍याचा ताशी वेग २४ ते २८ कि.मी. राहील. वार्‍याची दिशा नैऋ्रत्येकडून वाहणार असून नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव कायम राहणार आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान १५ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. एल-निनोचा प्रभाव संपुष्टात आला असून ला-निनाचा प्रभाव देखील वाढणार आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर वाढण्याची दाट शयता आहे.

विसर्ग पाण्याच्या क्युसेसमध्ये वाढ.. 

सध्या खडकवासला धरणातून मोठया प्रमाणात मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री आठ वाजता ५१३७ युसेसवरुन ७७०४ युसेसने वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल सुध्दा केला जाईल. तसेच, पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल, अशा सुचना मुठा कालवा पाटबांधारे उपविभागामार्फत देण्यात आल्या आहेत. 

शहरात झालेला पाऊस

ठिकाण         पाऊस
पुणे            ३.२ मिमी
पाषाण         ४.१ मिमी 
लोहगाव        ४.० मिमी

Related Articles