श्रीनगर : नायब राज्यपालांना अधिक अधिकार सोपविण्यासह केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील महिन्यात होणारी विरोधी पक्षांची बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सीपीआय(एम) चे ज्येष्ठ नेते एम.वाय.तारिगामी यांनी शनिवारी दिली. तारिगामी पुढे म्हणाले की, ७ ऑगस्ट रोजी ही बैठक स्थगित करण्यात आली आहे. मात्र, बैठकीची नवीन तारीख निश्चित केलेली नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे तारिगामी यांनी सांगितले.
Fans
Followers