स्कूल बसची मालमोटारीला धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू   

उत्तर प्रदेशातील बलियात अपघात

बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात स्कूल बसची मालमोटारीला शनिवारी सकाळी धडक दिली. या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला असून १३ जखमी झाले आहेत. 
 
१२ आणि १७ वयोगटातील दोनही विद्यार्थी एका खासगी शाळेत शिक्षण घेत होते, अशी माहिती बलियाचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांनी दिली. बलिया पेपहना मार्गावरील कापुरी नारायणपूर गावाजळ भीषण अपघात झाला होता. स्कूल बस अतिवेगाने धावत होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि तिने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मालमोटारीला धडक दिली. यश प्रताप सिंह (वय १६) याचा जागीच मृत्यू तर विशाल प्रताप सिंह (वय १७) याचा गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य १३ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ज्येष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी रुग्णालयाला भेट दिली असून जखमींची विचारपूस केली. 

Related Articles