E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सांगलीत लष्कर
Samruddhi Dhayagude
28 Jul 2024
सांगली : जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. कदाचित पुढील काही दिवसांत पूरस्थितीचे संकट उद्भवल्यास याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून भारतीय लष्कराची एक तुकडी शनिवारी जिल्ह्यात दाखल झाली. यामध्ये सुमारे ९० जवान आणि १० अधिकार्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिली.
या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले असले तरी गाफील राहून चालणार नाही. अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे.
यावेळी पोलिस अधीक्षक घुगे, मनपा आयुक्त गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. भारतीय लष्कराच्यावतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली. यावेळी मेजर विनायक, लेफ्टनंट आदित्य पुष्करनाथ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार लीना खरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री निकालानंतर ठरविला जाईल
09 Sep 2024
शाळकरी विद्यार्थ्यांना मालमोटारीची धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू
08 Sep 2024
डॉ. रोहित टिळक यांनी पोहचविला सर्वसामान्यांपर्यंत मोदकांचा प्रसाद
14 Sep 2024
महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती
13 Sep 2024
व्हॉट्सऍप कट्टा
09 Sep 2024
धर्मरावबाबा अत्राम यांची मुलगी शरद पवार गटात
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन