पॅरिस : चीनच्या नेमबाजपटूंनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पहिल्या दिवशी शानदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. चीनच्या ह्युयांग युटकिंग आणि शेंग हिलाओ या नेमबाजपटूंनी १० मीटर एअर रायफल पिस्तूल नेमबाजीतील मिश्र प्रकारात कोरियाच्या नेमबाजपटूंना मागे टाकत चीनसाठी पहिले सुवर्ण पदक पटकाविले. कोरियाच्या कियुम जिहायियान आणि पार्क हाजुन या नेमबाजपटूंनी जोरदार प्रयत्न करूनही त्यांना प्रथम क्रमांक मिळविता आला नाही. त्यांना दुसरे स्थान मिळविता आले. कियुम आणि पार्क यांनी पहिली फेरी जिंकली होती. पहिल्या फेरीत २०.६ आणि २०.३ असे गुण त्यांनी मिळविले होते. मात्र त्यानंतर त्यांना आघाडी टिकवता आली नाही. त्यानंतर चीनच्या नेमबाजपटूंनी दुसर्या फेरीत ६-२ अशी आघाडी घेतली. आणि पदकावर वर्चस्व मिळविले.
Fans
Followers