भारताचे तिरंदाजी महिला-पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत   

पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमधील सुरुवात तिरंदाजीतील सहभागाने मोहीम सुरु केली आहे. तिरंदाजीच्या क्रमवारीतील फेरीमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने  अव्वल ४  मध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. महिला आणि पुरुष संघांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवल्याने देशातील नागरिकांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.पुरुष संघाची पदक मिळवण्याची शयता जास्त आहे कारण तिरंदाजीतील पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघासोबत भारताचा सामना होणार नाही. धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी २०१३ गुण मिळत तिसर्‍या स्थानी झेप घेतला.भारताला तिसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात निश्चित करण्यात आलं आहे. भारताचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे. तुर्कीच्या संघाने ६ व्या तर कोलंबियाने ११ व्या स्थान मिळवले होते. १२ व्या स्थानावर असलेल्या संघाला उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी एका सामन्यात विजय मिळवत अव्वल ८ मध्ये स्थान मिळवावे लागते. भारताच्या संघाला पदक मिळू शकतं असं बोललं जातंय कारण अंतिम फेरीच्या लढतीपर्यंत भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार नाही. भारताने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास त्यांचा सामना फ्रान्स, इटली किंवा कझाकिस्तान यांच्या विरुद्ध होईल. विशेष बाब म्हणजे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने  दक्षिण कोरियाला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले होते. तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकासाठी सामना २९ जुलै रोजी होणार आहे.

Related Articles