कात्रजमधून वाहून गेलेल्या युवकाचा डेंगळे पुलाजवळ आढळला मृतदेह   

पुणे : पुणे शहर आणि जवळपासच्या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात बुधवारी संध्याकाळी कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अक्षय साळुंखे या तरुणाचा मृतदेह आज सकाळी मनपा जवळील डेंगळे पुलाजवळ आढळला.
 
या  मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेत होते. परंतु धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता सतत अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊनही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन, जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहनाने मनपा जवळील नदीपात्र येथे दोरी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युद्धपातळीवर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळला, त्या नंतर अक्षय साळुंखेचा असल्याचे स्पष्ट झाले.

Related Articles