E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कात्रजमधून वाहून गेलेल्या युवकाचा डेंगळे पुलाजवळ आढळला मृतदेह
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
पुणे : पुणे शहर आणि जवळपासच्या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात बुधवारी संध्याकाळी कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. अक्षय साळुंखे या तरुणाचा मृतदेह आज सकाळी मनपा जवळील डेंगळे पुलाजवळ आढळला.
या मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेत होते. परंतु धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता सतत अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊनही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन, जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहनाने मनपा जवळील नदीपात्र येथे दोरी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युद्धपातळीवर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळला, त्या नंतर अक्षय साळुंखेचा असल्याचे स्पष्ट झाले.
Related
Articles
भाजपकडून विपर्यास : पटोले
12 Sep 2024
मालमोटार-रिक्षा अपघातात २ ठार
09 Sep 2024
वाचक लिहितात
13 Sep 2024
मेलबर्नमधील गणपती महोत्सवाचे डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते उद्घाटन
10 Sep 2024
हिंदू मतदारांना घाबरवण्याचा भाजपचा प्रयत्न : फारूख
09 Sep 2024
कालिंदी एस्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)