ओबामा दांपत्याचा कमला हॅरिस यांना पाठिंबा   

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते, माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. 
 
अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी निवडणुकीतून नुकतीच माघार घेतील असून त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी देखील कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्या बायडेन यांच्या उत्तराधिकारी होण्यास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. ओबामा दांपत्यांनी कमला हॅरिस यांना फोन करून पाठिंबा जाहीर केला. ओबामा दांपत्यांचे हॅरिस यांच्याशी पूर्वीपासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. मिशेल यांनी कमला यांचा उल्लेख त्यांची मुलगी असा केला. तसे संबोधणे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. निवडणूक ऐतिहासिक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हॅरिस यांनी ओबामा दांपत्याचे आभार मानले आहेत. ओबामा दांपत्याने प्रथमच हॅरिस यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामळे दोघेही त्यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे तसेच त्यांच्या प्रचारासाठी आणि निधी संकलन करण्यास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Related Articles