मुसळधार पावसाचा उत्तराखंडला तडाखा   

रस्ते, पुलांचे मोठे नुकसान 

 
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील टेहरी गढवाल परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे बुढा केदार परिसरातील बालगंगा नदीला पूर आला आहे  रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी बालगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे घरे, शेतात पाणी घुसले. 
 
जखाना टोली अणि गेनवाली परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे बालगंगा नदीचे पाणी रस्त्याकडेच्या घरात आणि शेतात घुसले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी दिली. पुराच्या पाण्याने गावातील दुकानांचेही नुकसान झाले. नदी किनारी राहणार्‍या नागरिकांना स्थलांतरीत केल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. महसूल विभागाच्या पोलिस कर्मचार्‍यांनी पूरग्रस्त भागाकडे मदत करण्यासाठी धाव घेतली आहे. ते नुकसानीचा आढावा घेत आहेत. नदीकाठी राहणार्‍या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles