दौंड विभागात दोन दिवस ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा   

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात इलेट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या दुरुस्तीसाठी दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइनसाठी नॉन-इंटरलॉकिंगसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी या मार्गावरून धावणार्‍या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे, तर काही गाड्या अर्ध्या मार्गापर्यंत धावणार आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे. 
 
नांदेड-पनवेल एसप्रेस, पनवेल-नांदेड एसप्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एसप्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एसप्रेस, दौंड-निजामाबाद, सोलापूर-पुणे एसप्रेस, पुणे-बारामती-पुणे लोकल, पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, दौंड-बारामती लोकल, सोलापूर-दौंड-सोलापूर, पुणे-दौंड-पुणे, बारामती-पुणे, पुणे-दौंड, बारामती-दौंड, पुणे-हरंगुळ-पुणे एसप्रेस आदी गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एसप्रेस, पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. मुंबई-बेंगलोर उद्यान एस्प्रेस पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. नागरकोइल-मुंबई एसप्रेस गुंटकल-बेल्लारी-हुबली-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. बंगलोर-मुंबई उद्यान एस्प्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. चेन्नई-एकता नगर एसप्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. निजामाबाद-पुणे दौंड मार्गी वळवले आहे. कन्याकुमारी-पुणे एस्प्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. निजामुद्दीन-हुबली एसप्रेस मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे. बनारस-हुबली एसप्रेस मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे.

Related Articles