E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दौंड विभागात दोन दिवस ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात इलेट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या दुरुस्तीसाठी दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइनसाठी नॉन-इंटरलॉकिंगसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी या मार्गावरून धावणार्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे, तर काही गाड्या अर्ध्या मार्गापर्यंत धावणार आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.
नांदेड-पनवेल एसप्रेस, पनवेल-नांदेड एसप्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एसप्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एसप्रेस, दौंड-निजामाबाद, सोलापूर-पुणे एसप्रेस, पुणे-बारामती-पुणे लोकल, पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, दौंड-बारामती लोकल, सोलापूर-दौंड-सोलापूर, पुणे-दौंड-पुणे, बारामती-पुणे, पुणे-दौंड, बारामती-दौंड, पुणे-हरंगुळ-पुणे एसप्रेस आदी गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एसप्रेस, पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. मुंबई-बेंगलोर उद्यान एस्प्रेस पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. नागरकोइल-मुंबई एसप्रेस गुंटकल-बेल्लारी-हुबली-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. बंगलोर-मुंबई उद्यान एस्प्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. चेन्नई-एकता नगर एसप्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. निजामाबाद-पुणे दौंड मार्गी वळवले आहे. कन्याकुमारी-पुणे एस्प्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे. निजामुद्दीन-हुबली एसप्रेस मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे. बनारस-हुबली एसप्रेस मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे.
Related
Articles
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन
14 Sep 2024
ओडिशातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
11 Sep 2024
ब्रिटनच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी
14 Sep 2024
गणेशोत्सवात प्रसाद वाटपावर ’एफडीए’ची करडी नजर
09 Sep 2024
माथेफिरूकडून पत्रकारावर हल्ला
14 Sep 2024
व्हायोलीनच्या सुरांना श्रोत्यांची दाद
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)