E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र
राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन करू
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
दीपक केसरकर यांचा विश्वास
पुणे : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. मनसे आणि महायुतीतील पक्षांमध्ये वैचारिक साम्य आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे मतपरिवर्तन करू असा विश्वास शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केला.पुण्यात शिक्षण विभागाच्या बैठकीसाठी आले असता केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना राजकीय घडामोडींची माहिती दिली. राज ठाकरेंनी नुकताच विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. लोकसभेत महायुतीला पाठिंबा आणि विधानसभेला स्वबळाचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
बोलताना केसरकर म्हणाले, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती पाहून लोकसभेला पाठिंबा दिला. विधानसभेला देखील ते आमच्यासोबत येतील. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, असेही केसरकर यांनी सांगितले.मतभेद आणि जागावाटपाच्या चर्चेवर केसरकर म्हणाले, महायुती ही भक्कम आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही. विधानसभेला २०० आमदार निवडून आणण्याचे ध्येय आम्ही ठेवले असून पुन्हा सत्तेत येऊ याची मला खात्री आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील, हा विरोधकांना वाटणारा विश्वास खोटा ठरेल. विरोधकांना दिवसा स्वप्न पडत आहेत. आम्हाला स्वप्न पहायला वेळ नाही. विरोधकांची दिवास्वप्ने खरी ठरणार नाहीत.
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि वाघनखांवरील टीकेवर केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंना यांना उत्तम आरोग्य लाभो. देव त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानण्याची सद्बुधी देवो, असा टोला केसरकरांनी ठाकरेंना लगावला.
Related
Articles
असुरक्षित वाटल्यानेच ठाकरेंच्या भेटी वाढल्या : उदय सामंत
11 Jan 2025
दिल्लीत सराफी दुकानात दरोड्याचा प्रयत्न फसला
06 Jan 2025
बहाणा नको, बदल हवा !
11 Jan 2025
ट्रम्प शपथविधी सोहळ्यासाठी जयशंकर भारताचे प्रतिनिधी
12 Jan 2025
नांदेडमध्ये पिता-पुत्राने संपविले जीवन
11 Jan 2025
कहो ना प्यार है ! रौप्यमहोत्सवी वर्षात
10 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)