पाकिस्तानचे श्रीलंकेला माफक आव्हान   

डंबुला : श्रीलंका महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघात शुक्रवारी झालेल्या आशिया चषकाच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा निर्णय घेतला. 
 
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान महिला क्रिकेटपटूंनी २० षटकांत १४० धावा केल्या. या धावा करताना पाकिस्तानची सलामीची फलंदाज गुल फिरोझा हिने २४ चेंडूत २५ धावा केल्या. यावेळी ३ चौकार लगावले. तिओला श्रीलंकेची गोलंदाज प्रबोधनी हिने निलाकशी डी सिल्हा हिच्याकडे झेलबाद केले. 
 
मुनीब अली हिने ३४ चेंडूत ३७ धावा केल्या. यावेळी तिने ५ चौकार मारले. सिद्रा अमीन हिने १० धावा केल्या. सिद्रा हिला कवीशा दिलहारी हिने शानदार गोलंदाजी करत प्रबोधनीकडे झेलबाद केले. त्यानंतर निदा दार हिने २३ धावा केल्या.  तिला कवीशा दिलहारी हिने पायचित पकडले. तर अलिया रिझा ही १६ धावांवर नाबाद राहिली. तर फतीमा सना हिने नाबाद २३ धावा केल्या. तर ६ धावा अवांतर मिळाल्या.

Related Articles