भाजपच्या संघटनेत फेरबदल   

नवी दिल्ली : भाजपने संघटनेत पुन्हा एकदा फेरबदल केले आहेत. पक्षाने काही प्रदेश प्रभारींसह, प्रदेशअध्यक्ष बदलले आहेत. भाजपने शुक्रवारी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल यांची राजस्तानसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून तर लोकसभेचे माजी खासदार हरीश द्विवेदी यांची आसामसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली. या संदर्भात पक्षाने एक निवेदन काढले आहे. त्यानुसार, अरविंद मेनन यांना पुन्हा तामिळनाडूचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या सोबतच, माजी खासदार राजदीप रॉय यांना त्रिपुराचे प्रभारी बनवले आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी प्रमुख विजया रहाटकर राजस्तानमधील तर सुधाकर रेड्डी तामिळनाडूतील संघटनात्मक सहप्रभारी असतील.

Related Articles