पाकिस्तानने युद्धातून कोणताही धडा घेतला नाही   

द्रास, (कारगिल) : भारताविरोधातील युद्धात वारंवार पराभूत होऊनदेखील पाकिस्तानने त्यातून कोणताही धडा घेतला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर शुक्रवारी खडसावले. अग्निपथ योजना लष्करातील सुधारणांचे एक चांगले उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
 
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअलला काल भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे. कारगिल विजय दिनानिमित्त ते सदैव स्मरणात राहील, असेही त्यांनी सांगितले.मोदी पुढे म्हणाले,  आज लडाखची ही महान भूमी कारगिल विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याची साक्ष देत आहे. 

Related Articles