मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुयाच्या डोंगरी भागात संततधार चालू असलेल्या पावसाने घोडनदीला पूर आला आहे. घोड नदीपात्रात पूर परिस्थिती असल्याने कोणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण जवळपास ५० टक्के भरले आहे. आहुपे, गोहे खोर्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. या कारणामुळे घोडनदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग आल्याने घोडनदीच्या पात्रात भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बहुतांशी शेतकर्यांच्या शेतपंपाच्या मोटारी पाणीसाठा आल्याने पाण्याखाली गेल्या आहेत. तरी शेतकरी बांधवांनी घोडनदी पात्रात व नदी पात्रात पूर परिस्थितीत पाणीसाठा जास्त आल्याने जाण्याचे टाळावे. तसेच कळंब परिसरात नदी क्षेत्रालगत असणारे शेतकरी बबनराव सावळेराम कानडे यांच्या २० गुंठे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचे अंदाजे ३० हजार रूपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Fans
Followers