E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गुजरातमध्येही पावसामुळे नागरिकांची दाणादाण
Samruddhi Dhayagude
26 Jul 2024
वडोदरात २४ तासांत १३.५ इंच पाऊस; राज्यात पावसामुळे आठ जणांचा मृत्यू
सुरत :गुजरातमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वडोदरा, सुरत, भरूच आणि आणंदसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या वडोदरात २४ तासांत १३.५ इंच पाऊस झाला. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
या जिल्ह्यांतील सखल भागातील ८२६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.
म्हैसूरचे कृष्णराजा धरण १०० टक्के भरले
कर्नाटकात मुसळधार पावसामुळे कावेरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच म्हैसूर येथील कृष्णराजा सागर धरण १०० टक्के क्षमतेने भरले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरण १२४.८० फुटांपर्यंत पाण्याने भरले होते. गतवर्षी या हंगामात धरण केवळ ९५ फुटांपर्यंत भरले होते.
आज (शुक्रवार) हवामानाची स्थिती
आज (शुक्रवार) ओडिशा, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये अति मुसळधार पाऊस (१२ सेमी पेक्षा जास्त) होऊ शकतो.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा (७ सेमी पर्यंत) इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडूमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शयता आहे.
उत्तर प्रदेशात ४९ जिल्ह्यांमध्ये ९.५ मिमी पाऊस
पंधरा दिवसांच्या अतिउष्णतेनंतर उत्तर प्रदेशात मान्सूनचा प्रभाव दिसू लागला आहे. बुधवारी ४९ जिल्ह्यांमध्ये ९.५ मिमी पाऊस झाला, जो सामान्य पावसापेक्षा ४६ टक्के जास्त आहे. मुरादाबादमध्ये सर्वाधिक १३८ मिमी पाऊस झाला. यानंतर ललितपूरमध्ये ११० मिमी पाऊस झाला. शहरातील रस्ते कंबरभर पाण्याने भरले आहेत.
बिहारमध्ये पावसामुळे आर्द्रतेपासून दिलासा
बिहारमधील १९ जिल्ह्यांमध्ये पावसाची शयता आहे. याबाबत हवामान केंद्राने अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे नागरिकांना दमट उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनची ट्रफ लाइन राजस्थानच्या बिकानेर, सीकर, ग्वाल्हेरमधून जात आहे.
राजस्थानाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
राजस्थानमधील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील टोंक, सवाई माधोपूर, दौसा, अलवर, करौली आणि ढोलपूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चुरू, हनुमानगड, जैसलमेर आणि बारमेर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हलया पावसाची शयता आहे. चुरू-अलवरमध्ये २ ते ५ इंच पाऊस झाला.
अति मुसळधार (६ राज्ये) : गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, ओडिशा.
मुसळधार पाऊस (१० राज्ये) : छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ.
मध्य प्रदेशात १८ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
मध्य प्रदेशात सरासरी १४.६ इंच पाऊस पडला आहे. या मान्सूनच्या ३५ टक्के पाऊस येथे झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे नर्मदेच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली आहे. इतर नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. भोपाळ आणि जबलपूरसह १८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
12 Sep 2024
सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांनाही आयुष्यमान आरोग्य विमा
12 Sep 2024
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)
10 Sep 2024
पाकिस्तान ‘त्या’ एक कप चहाची किंमत चुकवतोय
09 Sep 2024
आफ्रिकेचे माजी मंत्री प्रवीण गोरधन यांचे निधन
14 Sep 2024
बारामुल्लामध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार
15 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)