तैवानमध्ये ’गॅमी’ चक्रीवादळाचा कहर   

चीनच्या किनारपट्टीला धडकण्याची भीती

बीजिंग : तैवानमध्ये गॅमी चक्रीवादळाने कहर केला असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ तैवान सामुद्रधुनीतून चीनच्या पूर्वेकडील समुद्रकिनारी धडकण्याची शक्यता आहे.  तसेच आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे वादळ चीनच्या दिशेने जाण्यापूर्वी एक मालवाहू जहाज बुडाले आहे.
 
 गॅमी चक्रीवादळ तैवानच्या वायव्य किनार्‍यावर यिलान काउंटीमध्ये बुधवारी मध्यरात्री धडकले. गेल्या आठ वर्षांतील हे सर्वात मोठे वादळ असून, ताशी 227 किलोमीटर (141 मैल) वेगाने पुढे सरकत असल्याचे केंद्रीय हवामान प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.15 वाजेपर्यंत वादळ तैवानच्या सामुद्रधुनीत होते. चीनच्या फुजियान प्रांतातील फुझोऊ येथे ते धडकणार होते.

Related Articles