E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या हॉलची नावे बदलली
Samruddhi Dhayagude
25 Jul 2024
दिल्ली : देशात काही शहरांची, रस्त्यांची नावे बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाशी आहे अशा बऱ्याच बाबतीत टीका-टिप्पणीही केली जाते. मात्र, आता थेट राष्ट्रपती भवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉलची नावे बदलण्यात आली आहेत. खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच या संदर्भातली घोषणा केली आहे. दरबार हॉल आणि अशोक हॉल अशी या दोन हॉलची पूर्वीची नावे होती.
राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी
दरबार हॉल आणि अशोक हॉल हे राष्ट्रपती भवनातल्या काही महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉल आहेत. यातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदानासारखे असे महत्त्वाचे सोहळे पार पडतात. तर दुसरीकडे अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात. या दोन्ही हॉलची नावे बदलण्या संदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी केले असून त्यात यासंदर्भात प्रयत्न केले जात होते, असे नमूद केले आहे.
“राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्वांचे प्रतिबिंब असावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत”, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले.
काय आहेत बदललेली नावे?
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामकरण आता ‘गणतंत्र मंडप’ असे करण्यात आले. तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘दरबार हा शब्द प्रामुख्याने भारतीय शासक व ब्रिटिशांच्या न्यायनिवाड्याच्या जागेशी संबंधित आहे. पण भारत प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात गणतंत्र झाल्यापासून हा शब्द गैरलागू झाला आहे. गणतंत्र पद्धती ही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अगदी प्राचीन काळापासून रुजलेली आहे’, असे या निवेदनात नमूद केले आहे.
अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जायचा. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. त्याशिवाय, सम्राट अशोकाच्या नावानेही हे नाव जोडले जाते. त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडले जाते. ‘अशोक हॉलचे नामकरण अशोक मंडप असे केल्याने भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येते आणि अशोक शब्दाशी निगडीत मुलभूत तत्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुघल गार्डनचेही नाव बदलले !
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले होते. “स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी भवनातील सर्व उद्यानांना एकच सामायिक नाव म्हणून अमृत उद्यान हे नाव दिले आहे”, अशी माहिती त्यावेळी राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी दिली होती.
Related
Articles
पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?
13 Sep 2024
वाचक लिहितात
14 Sep 2024
बारामतीत अजित पवारांचा निषेध
11 Sep 2024
हवामानातील बदल, बदलते मनही !
08 Sep 2024
पाकिस्तानात पुन्हा पोलिओ लशीकरण कर्मचार्यांवर गोळीबार
13 Sep 2024
लष्करी अधिकार्यासह मैत्रिणींना मारहाण
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन