फटाक्याच्या गोदामात स्फोटानंतर भीषण आग   

केरळमध्ये दोघांचा मृत्यू; १६ जखमी 
 
कोची : केरळमधील त्रिपुनिथुरा येथील फटाक्याच्या गोदामात सोमवारी भीषण स्फोटानंतर आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.  लहान मुले आणि महिलासह 16 जखमी झाले आहेत.
 
जखमींना कलाास्सेरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकीं चौघांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला व्यक्‍ती  तिरूवनंतपूरम येथील आहे. त्याचे नाव विष्णू असे आहे. गोदामातील आग अन्यत्र पसरली. त्याची झळ 25 पेक्षा अधिक दुकानांना बसली आहे. त्यांचे नुकसान झाले. तसेच दोन दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण समजलेेले नाही. गोदामात एका ठिकाणी फटाक्याचा साठा ठेवला होता. त्याला आग लागून भीषण स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटाचे आवाज अनेक किलोमीटपर्यंत ऐकू आले. तसेच हादरेही जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. स्फोट एवढा भीषण होता की, अग्‍निशमन केंद्र देखील हादरले होते. अग्‍निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली. परंतु स्फोट आगीनंतर परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
दाट नागरी वस्तीत  फटाक्याचे गोदाम होते.ते उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तपासही सुरू केल्याचे ते म्हणाले.
 

Related Articles