E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
कोल्हापूर
नागपूर
नाशिक
नांदेड
जळगाव
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
E-Paper
संपादकीय
‘प्रदूषणयुक्त’ दिवाळी (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
18 Nov 2023
दिवाळी म्हणजे फटाके हे जणू समीकरणच झाले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीच्या घोषणा दिल्या जात असल्या, तरी फटाक्यांची आतषबाजी वाढतीच राहिली आहे.
दिवाळीचा उत्सव उत्साही वातावरणात साजरा झाला खरा; पण फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुण्या-मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांतील हवेचा दर्जा खराब पातळीमध्ये नोंदवला गेला आहे. न्यायालयाचे निर्बंध झुगारून कोट्यवधींच्या फटाक्यांचा धूर झाला. विशेषतः नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके उडवण्याचा उच्चांक झाल्याने, हवेची गुणवत्ता ढासळून खराब पातळीत गेली, असे निरीक्षण भारतीय हवामान संस्थेने त्यांच्या ‘सफर’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदवले आहे. फटाक्यांमुळे रविवारी प्रदूषणाची पातळी (एअर क्वालिटी इंडेक्स) 212 टक्क्यांपर्यंत वाढली होती; तर त्याच दिवशी रात्री व सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 174 ते 212 टक्क्यांच्या दरम्यान पोहोचली होती. फटाक्यांच्या माध्यमातून अनेक विषारी वायू हवेत मिसळून आरोग्याला धोका निर्माण होत असूनही, फटाके उडवण्याचे प्रमाण कमी होत नाही. एकप्रकारे आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार 0 ते 50 हे स्वच्छ हवेचे निदर्शक मानले जाते. 101 ते 200 ही श्रेणी मध्यम स्वरूपात गणली जाते, तर 201 ते 300 श्रेणी वाईट आणि त्यापुढे अति वाईट, गंभीर या प्रकारांत गणली जाते. फटाके उडवल्यामुळे केवळ हवेची गुणवत्ता ढासळते एवढेच नव्हे, तर धूर आणि कचरा यांचे साम्राज्य निर्माण होते आणि कानठळ्या बसवणार्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणातही वाढ होते. दिवाळीच्या काळात सर्दी-खोकला, ताप आणि दम्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे अनिर्बंधपणे उडवलेले फटाके, हे महत्त्वाचे कारण होते. विशेषतः या काळात धुराचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढतात. फटाके उडवताना काळजी न घेतल्यास अपघातही घडू शकतात. हे सारे अनर्थ टाळण्यासाठी न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन आवश्यक ठरते; मात्र न्यायालयाच्या आदेशाकडेही डोळेझाक झाल्याचे वास्तव पाहायला मिळाले.
आरोग्यावर परिणाम
दिवाळीच्या काळात प्रदूषणाचा धोका वाढत असतो. वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासह शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने सायंकाळी 7 ते रात्री 10 ही वेळ निश्चित केली होती. त्याचप्रमाणे बांधकामावरही निर्बंध जारी केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यासंबंधीचे आदेश दिले होते. शहरातील वायुप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश गरजेचे होते; मात्र तरीही या निर्बंधाचे पालन न केल्याच्या संदर्भात 300 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. फटाक्यांचा अतिवापर हे उत्सव साजरे करण्याचे प्रतीक मानले जाऊ लागले आहे. केवळ दिवाळीसारखे सणच नव्हे, तर लग्नसमारंभ, नेत्यांचे वाढदिवस किंवा उत्सवी मिरवणुका अशा प्रसंगी मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात. फटाक्यांच्या उत्पादनात चीनच्या नंतर भारताचा क्रमांक लागतो. सुमारे 6 हजार कोटींची उलाढाल ही फटाक्यांच्या माध्यमातून होते. एकट्या मुंबईत दिवाळीच्या काळात पाचशे कोटींच्या फटाक्यांचा धूर करण्यात आल्याची आकडेवारी अचंबित करणारी आहे. तामिळनाडू फायरवर्क्स अँड एमोर्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या अहवालानुसार 2016 मध्ये 4 हजार कोटींच्या फटाक्यांची विक्री झाली होती, तर 2019 मध्ये पाच हजार कोटींची विक्री झाली होती. दर वर्षी त्यात वाढच होत आहे. याचे कारण दिवाळी म्हणजे फटाके हे जणू समीकरणच झाले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीच्या घोषणा दिल्या जात असल्या, तरी फटाक्यांची आतषबाजी वाढतीच राहिली आहे. पंजाबमध्ये शेतात उसाचे पाचट जाळण्यात येते. त्याचा धूर पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत पसरतो. दिल्लीत प्रदूषण वाढण्याचे ते एक कारण आहे. वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू श्वासावाटे फुफ्फुसात गेल्याने दमा, न्यूमोनिया, सर्दी, घसादुखी, फुफ्फुसाचा कॅन्सर, रक्तदाब वाढणे, आदी व्याधी सुरू होतात. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागांतील शुद्ध हवा हरवली आहे. मानवी चुकांमुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे वाढत्या प्रदूषणाचे आपण बळी ठरत आहोत. ते भविष्यात तरी टाळायलाच हवेत.
Related
Articles
हवामानबदलामुळे वाढली अन्न असुरक्षितता
26 Nov 2023
लोकमान्यांची विद्वत्तापूर्ण ग्रंथसंपदा
01 Dec 2023
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
30 Nov 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनि दर्शन
30 Nov 2023
ओलिसांच्या सुटकेसाठी हमासने घातल्या अटी
01 Dec 2023
कुणबी प्रमाणपत्रांना तात्काळ स्थगिती द्या
27 Nov 2023
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुणवत्तावाढीसाठी निपुण भारत अभियान
2
पुस्तकं वाचायला हवी...
3
अशी अनास्था काय कामाची?
4
दबावाची खेळी? (अग्रलेख)
5
गृहमंत्र्यांना घरचा रस्ता !
6
वाचक लिहितात