E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
कोल्हापूर
नागपूर
नाशिक
नांदेड
जळगाव
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
E-Paper
रविवार केसरी
पारंपरिक शॉपिंगला पर्याय नाही!
Kesari Admin
15 Nov 2023
राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
अलीकडेच दोन अहवाल माझ्या वाचनात आले, विषय होता ऑनलाइन शॉपिंग आणि पारंपरिक शॉपिंगमधील तुलनात्मक अभ्यास, एक होता विदेशी आणि दुसरा शुद्ध देशी अहवाल. 20 ते 25 टक्के लोकांना ऑनलाइन शॉपिंगचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मोठा फटका बसल्याचे पाहणीत दिसून आले. मागवलेली वस्तू अपेक्षित दर्जाची निघालीच नाही, घरपोच वितरणाला विलंब झाला, आलेली वस्तू सदोष (डिफेक्टिव्ह) निघाली इ. स्वरूपाच्या या ग्राहकांच्या तक्रारी होत्या.
हे अहवाल पाहिल्यानंतर अंतर्मुख झालो आणि या विषयावर लिहावे वाटले. आम्ही परंपरागत व्यापार क्षेत्रातील मंडळी. म्हणून आम्ही ऑनलाइन व्यापारावर मुळीच टीका करणार नाही. इंटरनेट युगाच्या या पद्धतीला आमचा विरोध असण्याचेही कारण नाही. मात्र काही तथ्ये वस्तुनिष्ठपणे मांडली पाहिजेतच ना! म्हणून हा लेखन संवाद.
आमचा तीन-चार पिढ्यांचा व्यवसाय, अनेक बदल झाले अडचणी आल्या तरी परंपरागत व्यापार टिकून आहे. हे प्रातिनिधक समजा. इंटनरेट पर्वात, ऑनलाइन शॉपिंगचा प्रकार पारंपरिक व्यापार संपवेल, असे चित्र प्रारंभी रंगवले गेले, सुरुवातीची आकडेवारी तेच सांगत होती.भारतात इंटरनेट सुविधेला खर्या अर्थाने 2004 पासूनच व्यापक स्वरूपात सुरुवात झाली. म्हणजे इंटरनेट ऑफिसमधून बाहेर पडून, तुमच्या-आमच्या मोबाईलपर्यंत पोहोचू लागले होते. त्याने अल्पावधीत मोबाईलमध्ये आपले पक्के घर बांधले आणि तेथूनच खरा ऑनलाइन शॉपिंग हा शब्द रूजू झाला.गेल्या दहा वर्षांमध्ये तो परवलीचा झाला. आजच्या वेगवान जगात, ऑनलाइन खरेदीची सोय ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. फक्त काही क्लिकसह, तुम्ही अक्षरशः काहीही ऑर्डर करू शकता आणि ते तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचते. म्हणून या काळात त्याने खरेदी-विक्रीचा प्रांत आपल्या कवेत घेतला.
मात्र 2021 पासून आतापर्यंतची आकडेवारी सांगते की, ग्राहक पुन्हा प्रत्यक्ष खरेदी किंवा पारंपरिक शॉपिंगकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. डिजिटल शॉपिंग क्रांतीमध्ये, पारंपरिक खरेदीची पद्धत आपले स्थान अद्यापही नुसतेच टिकवून आहे, असे नव्हे तर तिचा जनाधार किंवा ग्राहकाधार पुन्हा वाढू लागला आहे.दि पूना मर्चंट्सचा चेंबरचा अध्यक्ष या नात्याने मी या नव्या ट्रेंडचे स्वागत करतो. असा बदल होण्यामागची काय कारणे आहेत, यावर या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू या.
प्रत्यक्ष अनुभव
पारंपरिक खरेदी एक प्रत्यक्ष अनुभव असतो, स्वत:च्या डोळ्यांनी वस्तू पाहण्याचा अनुभव खूप सुखावणारा, मनात रूजणारा असतो. ज्याची सोख ऑनलाइन खरेदी प्रकारात नाही. तुम्ही प्रत्यक्ष स्टोअरला भेट देता तेव्हा, तुम्ही उत्पादनांना स्पर्श करू शकता, अनुभवू शकता आणि कपडे असतील तर ट्रायलही घेऊ शकता. कपड्यांचे पोत असो, गॅझेटचे वजन असो किंवा स्थानिक बाजारपेठेतील ताज्या उत्पादनांचा सुगंध असो, संवेदनाक्षम अनुभव उत्पादनांशी तुम्हाला थेट जोडतो आणि त्यामुळे तुम्हाला निवड करणे सोपे जाते.
वैयक्तिक सहाय्य
प्रत्यक्ष स्टोअरमध्ये, तुम्हाला जाणकार विक्री सहयोगींच्या कौशल्याचा फायदा होतो. या व्यक्ती वैयक्तिकृत शिफारसी देऊ शकतात, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात आणि तुमच्या खरेदीसाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. सेवेचा हा स्तर ऑनलाइन शॉपिंग प्रकारात अशक्य आहे, जेथे खरेदीदाराला अनेकदा उत्पादनांच्या विशाल समुद्रात तरंगण्यासाठी सोडले जाते. ज्यातून संभ्रमावस्था निर्माण होण्याची अधिक शक्यता असते.
सामाजिक सुसंवाद
पारंपरिक खरेदीचा प्रकार एक प्रकारची सामाजिक पर्वणीदेखील आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांना किंवा कुटुंबियांना वेळ देण्याची, भेटण्याची, विक्री करणार्यांशी थेट संवाद साधण्याची आणि सहकारी खरेदीदारांशी संवाद साधण्याची संधी मिळते. हा पैलू खरेदीसाठी केवळ आनंददायक अनुभवच देत नाही, तर इतरांकडून मौल्यवान शिफारसी मिळू शकतात, शिवाय तुमच्या माहितीत चांगली भरही पडू शकते.
खरेदी केलेल्या वस्तू आपण त्वरित घरी नेऊ शकतो. ऑनलाइन शॉपिंगमध्ये प्रतीक्षा आहे आणि वस्तू पोहोचण्याची वेळ तुमच्या सोयीची असेलच असे नाही. अलीकडे अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जात नाही, हा मुद्दा तर वेगळाच.
वस्तू परत करण सोपे
एखादी वस्तू आपणास आवडली नाही, तर ती संबंधित दुकानात जाऊन परत करणे, ‘ऑनलाइन रिटर्न’ पेक्षा खूप सोपे असतो. तुम्ही दुकानादाराला व्यक्तिशः भेटून, तुमच्या समस्या मांडू शकता आणि तात्काळ मदत मिळवू शकता. याउलट ‘ऑनलाइन रिटर्न’ अधिक वेळ घेणारे असू शकतात, त्यात पॅकेजिंग, शिपिंग आणि परतावा यावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
स्थानिक व्यवसायांचे बळकटीकरण
पारंपरिक खरेदी जवळच्या लहान-मोठ्या व्यवसायांना हातभार लावताना, स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देऊन स्थानिक समुदायांना बळकट करू शकते. तुम्ही स्थानिक स्टोअरमध्ये खरेदी करता तेव्हा, तुम्ही नोकर्या निर्माण करण्यात, समुदायाच्या वाढीस प्रोत्साहन देता आणि एकतेची भावना वाढवण्यास मदत करता.
सुरक्षा
ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहकाला क्रेडिट - डेबिट कार्ड नंबर द्यावा लागतो, इतर व्यक्तिगत तपशीलही घेतला जातो. ही माहिती गोपनीय असते, कधी-कधी तर नवरा-बायको सुद्धा हे तपशील एकमेकांना शेअर करत नाहीत. इतकी गोपनीयता बाळगली जाते. मात्र ईकॉमर्स कंपन्यांकडे आपला सारा डेटा असतो. तो सुरक्षित राहण्याची कसलीही खात्री नाही. उलट त्याचा वापर इतर कारणांसाठी होत असल्याच्या बातम्या आपल्या वाचनात येत आहेत.
काही ग्राहकांना ‘बार्गेनिंग’ किंवा सौदेबाजी करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. त्यात यश येवो अथवा न येवो, मात्र ती मानसिकता आहे. हा आनंद ऑनलाइन शॉपिंगमध्ये कधीच मिळणार नाही. बर्याचदा शिपिंग दरम्यान, सामान गहाळ होणे, अतिरिक्त विलंब लागणे असे प्रकार घडतात, परिणामी डोकेदुखी वाढते. पारंपरिक प्रकारात अशा ‘डोकेदुखी’ला स्थानच नाही.तसेच पारंपरिक खरेदी तुम्हाला उत्पादनांच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष तपासणी करण्याची सुसंधी देते. खरेदी करण्यापूर्वी तुम्ही साहित्य, कारागिरी आणि एकूण स्थितीचे मूल्यांकन करू शकता. महागड्या वस्तू करताना, हे जरूरी असते. उदा. तुम्ही टीव्ही खरेदी करणार असाल, तर प्रत्यक्ष तो चालवून पाहणे पसंत कराल की नाही?.
शिवाय पारंपरिक खरेदी प्रकारात तुम्हाला कामातून आपोआप ब्रेक मिळतो आणि तुमच्या शारीरिक हालचाली होतात. तो स्क्रीनपासूनही ब्रेक देतो. अलीकडे ‘स्क्रीन ब्रेक’ अत्यंत आवश्यक झाला आहे.ऑनलाइन शॉपिंग निःसंशयपणे सोयीस्कर आहे आणि त्याचे फायदेही आहेत; पण ते पारंपरिक शॉपिंगला कधीच पर्याय ठरू शकत नाही. विशेषत: जेव्हा आपण अन्नधान्य आणि तत्सम जीवनावश्यक वस्तू खरेदी करतो तेव्हा तर पारंपरिक खरेदीला दुसरा पर्यायच असू शकत नाही, अशी आमची ठाम धारणा आहे.
पारंपरिक खरेदीमुळे मानवी नातेसंबंध अधिक वृद्धिंगत होतात, जी काळाची गरज आहे. आपल्या हृदयात आणि दैनंदिन जीवनात आनंदवृद्धीसाठी मशीनशी मैत्री करण्यापेक्षा मानवी मैत्री वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे पारंपरिक खरेदी एक आकर्षक पर्याय बनतो.पारंपरिक व्यापाराचा परिणामकारक संदेश देणारा एक व्हिडिओ नुकताच पाहण्यात आला. एक गृहिणी घराला लागणार्या वस्तूंची नेहमी जवळच्या दुकानातून खरेदी करायची. ती दोन वर्षांपासून ऑनलाइन खरेदी करू लागली, पण पतीची नोकरी गेल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. ऑनलाइन व्यवहार नगदी असतात, तिथे कोण उधार देणार? अखेरीस तिने तिचे जुने दुकान गाठले. तब्बल दोन वर्षांनी आलेल्या गृहिणीचे दुकानात पूर्वीसारखेच स्वागत झाले आणि तिला उधारीवर गृहोपयागी सामानही मिळाले.
पारंपरिक व्यापाराचा हा गुण ऑनलाइन व्यापार कधी घेऊ शकेल का? म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा विचार कराल, तेव्हा पारंपारिक खरेदीच्या पर्यायाला पहिले प्राधान्य द्याल, याची खात्री आहे. बदलता ट्रेंड दिलासादायक असला, तरी आम्हाला तेवढ्यावर विसंबून राहता येणार नाही. आम्ही काम करत राहणार आहोत. ईकॉमर्स आणि पारंपरिक व्यापार यांच्यासाठी असलेली धोरणे आणि सुविधा-सलवतींमध्ये खूप तफावत आहे. ही दरी दूर करण्यासाठी आमचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरूच राहील आणि यात आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास आहे.
Related
Articles
शाकिब अल हसन आता राजकीय मैदानात
28 Nov 2023
मजुरांसाठी तयार करण्यात आलेली नियमावली गुंडाळली
30 Nov 2023
बोगदा दुर्घटनेने काय दाखवले?
01 Dec 2023
युगांडा टी-20 विश्वचषकासाठी पात्र
01 Dec 2023
मुलाच्या नावावर संपत्ती करणे चूकच
25 Nov 2023
खलिस्तानी समर्थकांची भारतीय राजदूतांना धक्काबुक्की
28 Nov 2023
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुणवत्तावाढीसाठी निपुण भारत अभियान
2
पुस्तकं वाचायला हवी...
3
अशी अनास्था काय कामाची?
4
दबावाची खेळी? (अग्रलेख)
5
गृहमंत्र्यांना घरचा रस्ता !
6
वाचक लिहितात