पुणे : पुणे परिमंडलातील 7 लाख 88 हजार 881 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे 191 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 6 लाख 81 हजार 208 ग्राहकांकडे 121 कोटी 81 लाख, वाणिज्यिक 96 हजार 316 ग्राहकांकडे 47 कोटी 3 लाख व औद्योगिक 11 हजार 357 ग्राहकांकडे 22 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र उद्या (शनिवारी) व रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा