चेन्नई : आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि चेन्नई संघात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने जीटी 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीतील एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या नावांचा समावेश आहे. त्तपुर्वी सीएसकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने एक मोठे वक्तव्य केले आहे. 26 मे रोजी फायनलमध्ये पोहोचणार्‍या दुसर्‍या संघाचे नाव निश्चित होईल, परंतु त्याआधी सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याच्या आवडत्या संघाचे नाव सांगितले आहे. ज्याच्याविरुद्ध त्याला अंतिम फेरीत खेळायचे आहे.

गुजरातविरुद्धच्या विजयानंतर जिओ सिनेमाशी बोलताना दीपक चहरने सांगितले की, त्याला अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायला आवडेल. दीपक चहर म्हणाले, एमआयला हरवायला मजा येईल, जर एमआय आले तर त्यांच्याशी आमचे जुने नाते आहे. जर ते आले तर हा सामना खूप मनोरंजक असेल. दीपक चहरला मध्येच थांबवताना सुरेश रैनाने त्याला विचारले की, चेन्नईचा सर्वाधिक वेळा मुंबईकडून फायनल पराभव झाला आहे, तेव्हा दीपकने उत्तर दिले की, तेच बदलायचे आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ 10व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 वेळा आणि एकूण 9 वेळा फायनल खेळली आहे. त्या 4 सामन्यांमध्ये मुंबईने तीन वेळा तर चेन्नईने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. सीएसके ने 2010 च्या फायनलमध्ये फक्त एकदाच मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने 2013, 2015 आणि 2019 मध्ये चेन्नईला फायनलमध्ये पराभूत केले आहे. मुंबई इंडियन्स या वर्षीही अंतिम फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार आहे.

चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएल 2023 च्या फायनलपूर्वी जबरदस्त लयीत परतला आहे. दुखापतीमुळे गेल्या मोसमात खेळू न शकलेला दीपक चहर या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्येही प्रभावी दिसत नव्हता. दीपकला पहिल्या 4 सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती, मात्र दीपकने शेवटच्या 5 सामन्यात 12 बळी घेतले आहेत. यादरम्यान दीपकने पॉवरप्लेमध्ये चांगल्या विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याने इशान किशन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, फिलिप सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, जेसन रॉय, रिले रोसो आणि शुबमन गिल या खेळाडूंना बाद केले आहे.

धोनी वेळ वाया घालवत होता आणि पंच हसत होते, का नाही केली कारवाई? : ब्रॅड हॉग

सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 172 धावा केल्या. गुजरात टायटन्सला 20 षटकांत केवळ 157 धावा करता आल्या. चेन्नईच्या विजयात त्याचा युवा गोलंदाज मथीशा पथिरानाने महत्त्वाची भूमिका बजावली. महेंद्रसिंग धोनीने या प्रभावशाली खेळाडूकडून षटक टाकून घेण्यासाठी मोठी हुशारी दाखवली, पण ऑस्ट्रेलियन अनुभवी ब्रॅड हॉगला माहीची ही चाल आवडली नाही.

पथिराना 16 वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा अंपायरने त्याला थांबवले. नियमानुसार, जर पथिराना आधी मैदानाबाहेर असेल, तर तो ठराविक वेळेनंतरच गोलंदाजी करू शकत होता. धोनीने याबाबत पंचांशी बोलण्यास सुरुवात केली आणि प्रतीक्षाची वेळ संपली. यामुळे पथिरानाला षटक टाकण्यासाठी थांबावे लागले नाही. महेंद्रसिंग धोनीचे हे कृत्य ब्रॅड हॉगच्या पचनी पडले नाही.

श्रत्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘धोनीने त्याच्या उपस्थितीचा फायदा घेतला आणि पथिराणाला गोलंदाजी करता यावी म्हणून पंचांची 4 मिनिटे वाया घालवली. ते थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते, तेव्हा या घटनेवर पंच हसत होते. पथीरानाने सामन्यात दोन विकेट घेतल्या. अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनेही निवृत्तीबाबत वक्तव्य केले.

तो म्हणाला, ‘मी आयपीएल खेळणार की नाही, मला माहित नाही. हा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आणखी 8-9 महिने आहेत. मग त्याचा विचार आतापासून का करायचा? मी खेळेन किंवा नाही याबाबत आत्ताच सांगू शकत नाही. मात्र, नेहमीच सीएसकेसाठी उपस्थित राहीन. सीएसके संघ 2008 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 14 हंगाम खेळले आहेत, ज्यामध्ये संघ 12 वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे आणि 10 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही सीएसके संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा