फ्लोरिडात नवा आदेश तातडीने लागू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याने कोणत्याही चिनी नागरिकाला मालमत्ता खरेदी करता येणार नाही, असा आदेश सोमवारी काढला आहे. याबाबतचा कायदा तातडीने लागू झाल्याची घोषणाही केली आहे.

मालमत्ता खरेदीला बंदी घालण्याचा हा कायदा प्रामुख्याने लष्करी ठिकाणांच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरातील मालमत्तांसदर्भात आहे. चिनी उद्योगपती लष्करी ठिकाणांच्या परिसरातील जागा, मालमत्ता खरेदी करून तेथे हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्‍तचर विभागाने व्यक्‍त केला होता. पण, या निर्णयाचा फटका क्युबा,वेनेझुएला, सीरिया, इराण, रशिया आणि उत्तर कोरियाच्या नागरिकांना बसणार आहे. पण, प्रामुख्याने हा कायदा चिनी नागरिकांसाठी तयार केला आहे. पण, कायद्यामुळे आशियातील नागरिकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोपही आता होत आहे. घरबांधणीसंदर्भातील कायद्याचे देखील नव्या आदेशामुळे उल्‍लंघन होत असल्याची टीका होत आहे. आशियाई, रशियन, क्यूबाच, वेनेझुएलाचा किंवा सीरियाचा नागरिक अशी हेटाळणी या नव्या आदेशामुळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भेदाभेद निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित देश नव्या कायद्यामुळे दुखावले जातील, अशी भीतीही व्यक्‍त करण्यात आली आहे.

हेरगिरीच्या संशयामुळे निर्णय

प्रामुख्याने चिनी नागरिकांवर पहिली कायद्याची कुर्‍हाड कोसळणार आहे. एखादा चिनी नागरिक सुरक्षेला बाधा पोहोचवत नसेल, तर तो त्यात आता भरडाला जाणार आहे. अगोदरच सुरक्षेवरून चीन आणि अमेरिकेत वाद आहेत.

फुग्यांचे रहस्य कायम ?

काही महिन्यांपूर्वी फुग्यांच्या माध्यमातून चीनने अमेरिकेत हेरगिरी केली, असा आरोप झाला होता. चीनने फेटाळून लावले होते. फुगे हवामानाचा वेध घेणारे होते, असा दावा केला. परंतु लष्करी ठिकाणावरच नेमके कसे होते ? याचे रहस्य कायम आहे. मात्र, अमेरिकेने ते फुगे नष्टही केले होते. यावरून चीन आणि अमेरिका समोरासमोर आले होते. त्यांच्यात तणाव वाढला होता. आता मालमत्तेसंदर्भात नियम कडक करून अमेरिकेने चीनला पेचात टाकले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा