मुंबई, (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सर्व बाजूंचा विचार करून मेरिटवर निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे, यात काहीही गैर नाही, काँग्रेसनेही संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका महविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने घेतला आहे. परंतु, जागांचे दावे व थोरल्या-धाकट्याच्या टिप्पण्यांमुळे आघाडीतील बेबनाव समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जागावाटप मेरीटवरच होईल, असे सांगितले.

संघ मुख्यालयाला भेटल्यानंतर एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लागला आहे. वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले. त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला असून, हे सारे संशयास्पद वाटते, असेही पटोले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा