धनंजय दीक्षित
dhananjay@kalyanicapital.com

काही प्रचलित योजना

बेअरिश व्हर्टिकल स्प्रेड (put option) : जेव्हा ऑप्शन व्यापार्‍याच्या मते बाजाराचा कल मंदीकडे झुकण्याची शक्यता असते, तेव्हा ही योजना राबविली जाऊ शकते. फक्त इथे आधी एक पुट ऑप्शन विकत घेतला जातो, ज्यामुळे त्या विशिष्ट स्ट्राइक प्राइसच्या खाली व्यापार्‍याचा फायदा निश्चित होतो. या खरेदीसाठी जी किंमत मोजावी लागली त्याचा भार कमी करण्यासाठी व्यापारी पहिल्या स्ट्राइक प्राइसच्या खालच्या स्ट्राइक प्राइसचा पुट ऑप्शन विकतो.

याचं एक उदाहरण पाहूया :

6200 स्ट्राइक प्राइसचा पुट खरेदी करायचा (long) व त्यासमोर 6000 चा पुट विकायचा (short) व्यवहाराच्या सुरुवातीला जर दोन्ही किमती अनुक्रमे 220 व 170 असतील, तर ही योजना अशी मांडता येईल

ऑप्शन प्रकार पुट पुट
खरेदी-विक्री long short
स्ट्राइक प्राइस 6200 6000
प्रीमियम 220 170
निफ्टीचे मूल्य 6000

निफ्टीच्या वेगवेगळ्या बंद भावावर आधारित नफा-तोटा याचे खालीलप्रमाणे कोष्टक तयार करता येईल.

निफ्टीचा पुट long पुटshort निव्वळ
बंद भाव नफा-तोटा
5600 व 380 -230 150
त्याखालचा भाव
5700 280 -130 150
5800 180 -30 150
5900 80 70 150
6000 -20 170 150
6100 -120 170 50
6200 -220 170 -50
5600 किंवा त्याखाली कुठेही निफ्टीचा बंद भाव असेल, तर long पुटमध्ये ((6200- बंदभाव) -220) इतके पैसे येतील; पण short पुटमध्ये (6000- बंदभाव) -170) इतके पैसे जातील आणि यामधील फरक हा कायम +150/- एवढा असेल.

या उलट जर भाव 6200 किंवा त्याच्यावर कितीही बंद झाला तर श्रेपस पुटमध्ये प्रीमियमचे भरलेले 220/- इतके पैसे आणि long पुटमध्ये आलेले प्रीमियमचे पैसे 170/- यातील फरक म्हणजे 50/- एवढाच तोटा होईल. या योजनेचा ना नफा ना तोटा बिंदू (short) म्हणजे 6150 चा बंद भाव हा असेल.

वरील उदाहरण हे सैद्धांतिकरित्या चोख असले, तरी या आकडेमोडीमध्ये कुठेही दलाली व बाकी खर्च गृहीत धरलेले नाहीत तसेच लागणार्‍या मार्जिनचा विचार केलेला नाही.

शिवाय ही सगळी आकडेमोड ही निफ्टीच्या एका युनिटसाठी केली आहे. प्रत्यक्षात निफ्टीचे व्यवहार हे नेहमी 50 युनिट किंवा त्याच्या पटीत असतात. त्यामुळे नफा-तोटा त्यापटीत होईल व प्रत्यक्षात इथे दाखवल्या इतकी सोपी गणिते मांडता येतीलच असे नाही.

(सरतेशेवटी : हे व्यवहार हे leveraged स्वरूपाचे असतात. म्हणजेच जेवढे मार्जिन जमा असते त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त मूल्याचे व्यवहार आपण करू शकतो. म्हणूनच कुठलाही व्यवहार करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच मग निर्णय घ्यावा)

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा