सोलापूर : मंदिरामध्ये तोकडे वस्त्र परिधान करणाऱ्यांना अमंदिरात प्रवेश बंद या संदर्भात फलक लावण्यात आला आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्येतेचे भान ठेवण्यासंदर्भात मंदिरामध्ये फलक लावण्यात आले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे.

असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आला आहे.

आज १८ मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आलेत. मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही आहे. गणवेशा बाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा