मुंबई : मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे मंगळवारी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
महाडेश्‍वर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष याचे खंदे समर्थक होते. हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. चार वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. 2002 मध्ये पहिल्यांदा ते नगरसेवक झाले. 2017 ते 2019 दरम्यान, ते मुंबईचे महापौर होते, अशी माहिती त्यांचे सहकारी आणि माजी नगरसेवक चंद्रशेखर वाईंगणकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा