मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयावर आणि शरद पवार यांनी आत्मचरित्रात मत व्यक्‍त केले होते. ’त्या’ घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांनी परखड भाष्य केले आहे. पवारांचा अध्यक्षपदाचा निर्णय झाल्यानंतर मी भाष्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्धव यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाने अंतर्गत काय करावे, याचा अधिकार त्यांना असतो. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यावर काय बोलायचे ते बोलू.

लोक माझे सांगाती हे शरद पवार यांचे आत्मचरित्र आणि त्यातील घटनांवर उद्धव यांनी भाष्य केले. कुणी काय लिहावे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय काम केले हे जगजाहीर आहे. माझी मत ठाम आहेत. मला व्यक्तींचा किंवा मोदींचा पराभव करण्यासाठी नाहीतर वृत्तीचा पराभव करायचा आहे. माझ्याकडून महाविकास आघाडीला कोणतेही तडे जाणार नाहीत, असेही उद्धव म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा