स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड

एकदा गंगाधरशास्त्री टिळक ठाण्याहून घरी आले असता, त्यांना एक सुंदर नक्षी काढलेली वही दृष्टीस पडली. ती वही उघडून बघताच त्यांना आपल्या मुलाच्या ज्ञानाचा आविष्कार जाणवला. त्या वहीत टिळकांनी संस्कृत मजकुराचे इंग्रजी भाषांतर लिहिले होते व त्यावर 13 जुलै 1871 अशी तारीखही नमूद केली होती. या संपूर्ण भाषांतराच्या शेवटी टिळकांनी स्वरचित तीन संस्कृत श्लोक लिहिले होते. वहीत मजकुराला नाव ठेवणारे कोणी उगवलाच तर त्यासाठी त्यांनी उत्तर आधीच देऊन ठेवले होते. या उदाहरणावरून टिळकांची बौद्धिक झेप लक्षात येते. टिळकांनी याच काळात अभ्यासार्थ प्रस्तरवृत्तांचे एक टिपण तयार केले होते. ते त्यांच्यापाशी चाळीसपंचेचाळीस वर्ष सुरक्षित राहिले होते. मोरोपंत पराडकरांची संस्कृत कविता त्यांच्या हस्तलिखितावरून छापण्याचे काम सुरू होते. तेव्हा त्या कवितांमधील एका कवितेचे वृत्त परिचित वृत्ताबाहेरचे निघाले आणि संपादकांना त्याचे कोडे पडले. मयूरकाव्य प्रकाशनाचे रा. द. पराडकर यांनी हा प्रश्न टिळकांना विचारला तेव्हा टिळकांच्या प्रस्तरवृत्त संबंधातील कामगिरीचे गुपित फुटले. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी स्वतः काही संस्कृत काव्यरचना केल्या होत्या.

लोकमान्य टिळकांना कॉलेजमध्ये गणिताबरोबर संस्कृत हा विषय शिकवावा लागत असे. त्यासाठी कालिदासाचे ’मेघदूत’ आणि भ्रातृहरीचे ’नीतिशतक’ ही काव्ये त्यांना शिकवावी लागायची. त्यांचे संस्कृत शिकवणे, गणिताप्रमाणे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जाणारे नव्हते, उलट काव्याची गोडी उत्पन्न करणारे होते.
’मेघदूत’, काव्य शिकवताना पहिल्या श्लोकातून दुसरा श्लोक कसा निघाला हे सिद्ध करण्याच्या हातोटीमुळेच, सखोल अभ्यासाची दृष्टी लोकमान्य टिळकांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न केली होती. गणित, तंत्रज्ञान सारखे यांत्रिक विषय आणि संस्कृतमधील ’मेघदूत’ सारखे कलात्मक विषय अशा परस्पर विरोधी विषयांची त्यांना उत्तम जाण होती. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी स्वतः काही संस्कृत काव्यरचना केल्या होत्या.

एकदा टिळक कोल्हापूरला गेले असताना तिथल्या संस्कृत पाठशाळेने त्यांचे स्वागत केले. त्यावेळी खुपेरकरांच्या आणि दुसर्‍या एका नियमितपणे कविता लिहिणार्‍या विद्यार्थ्यांच्या रचना टिळकांसमोर सादर करण्यात आल्या. पण, या रचना कोणी केल्या, हे त्यांना सांगितले नव्हते. कविता वाचून झाल्यावर टिळकांनी त्या संदर्भात मूल्यमापन केले होते.

लोकमान्य टिळकांनी, मंडाले तुरुंगात केलेल्या काही कविता मंडालेच्या त्यांच्या कागदपत्रात सापडतात. लोकमान्य टिळकांचा ’कवी’ म्हणून नसलेला परिचय आपल्याला इथे पाहायला मिळतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा