तोलताना पेलताना मोहरणारे झाड दिसते
हिरवी माया प्रसवणारे, सखे तुझेच रूप असते….
सोनियाचा दिन आजचा सुवर्णशेला धरणी विणते
दाटून येई गर्द निळाई, अंबरातुनी अमृत झरते….
पिऊन सारे वादळवारे, अस्तित्वाची मोहर उमटे
भान ठेवुनी भवतालाचे, उरात अवघी माया दाटे….
ऋतुंसवे फुलताना तू देह झाला पारिजात
गंधकोष पाचूंचे, रूजविलेस आत आत….
कधी दाटले कढ उन्हाचे कधी शिणुनी गात्रं
सावलीला सार्यांसाठी, तूच एकमात्र…
संजीवन श्वास तुझे तुज निर्मितीचे डोहळे
क्षितिजाच्या पार तुझ्या, कौतुकाचे सोहळे…
हाक तुझी ऐक तू घे कवेत तूच तुला
कर्तृत्वासी कोंदण होई, नक्षत्रांचा स्वर्णझुला…
- शिल्पा चिटणीस
मो. 7588865053
जेव्हा मेहनत करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, ‘सिद्धांत‘ नाही.
कारण झाड नेहमी ’पान’ बदलतात ’मूळ’ नाही.
भगवद्गीतेत स्पष्ट लिहिले आहे-निराश होऊ नको ’कमजोर’ तुझी वेळ आहे ‘तू‘ नाही!
मागितले तरी सुख उसने मिळत नाही.
प्रयत्नांशिवाय कधीच ध्येयाचे शिखर गाठता येत नाही.
आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा.
‘योग्य वेळी तो एवढं देतो, की मागायला काहीच उरत नाही‘.
दगडाचं तर ठीक आहे हो…..
थोडा शेंदुर फासला म्हणजे
एकदा देव तरी तयार करता येईल
पण माणसाला असा कोणता रंग द्यावा
म्हणजे माणसाचा
माणूस बनवता येईल?
गर्लफ्रेंड (नाराजीच्या सुरात) : इतका उशीर का झाला? कधीपासून वाट बघतेय..
बॉयफ्रेंड : बॉसनं थांबवलं होतं.. त्यांच्यासोबत डिनर करत होतो..
गर्लफ्रेंड : काय खाल्लं?
बॉयफ्रेंड : शिव्या