बीजिंग : भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) लडाख भागातील परिस्थितीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होत आहेत, परंतु दोन्ही देशांना युद्ध किंवा संघर्ष नको आहे, अशी कबुली चीनचे प्रभारी मा जिया यांनी बुधवारी दिली आहे. जी-20 मध्ये युक्रेनवर आलेले संकटाबाबत न बोलल्यामुळे चीन आणि रशियाच्या फूट पडल्याचे त्यांनी नाकारले आहे.

मा जिया म्हणाल्या, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या स्थिर आहे. सीमेवर शांतता राहण्यासाठी चार्चा आणि नियंत्रण याला दोन्हीकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे, कारण चीन किंवा भारत दोघांनाही युद्ध नको आहे. जोपर्यंत दोन्ही देशांकडे समजूतदारपणा आणि समज आहे, तोपर्यंत आम्ही यामधून मार्ग काढू शकतो, असा मला विश्वास आहे. सीमेच्या मुद्द्यावर करार करणे सोपे नाही. कारण ते अत्यंत गुंतागुंतीचे आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मार्ग काढू शकतात.

वाद झाल्यास पायाभूत सुविधांवर भर देतील

’स्थानिक आर्थिक विकासासाठी चीन सीमेवर पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. सीमावर्ती भागात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा संघर्ष झाला, तर दोन्ही बाजूंनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लोक अधिक भर देतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा