रशियाकडून निषेध

कीव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा 21 मार्च रोजी अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, जपानच्या पंतप्रधानांनी रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा निषेध केला आहे. किशिदा यांची ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शांतता दूत म्हणून रशियाला पोहोचले आहेत. युध्दानंतर किशिदा यांनी प्रथमच युक्रेनला भेट दिली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया कमकुवत करणे

संयुक्त दिलेल्या निवेदनानुसार, युक्रेनविरुद्ध रशियाची आक्रमकता आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवीत आहे. यावर भर देण्यात आला. केवळ युरो-अटलांटिक प्रदेशाचीच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा, शांतता आणि स्थैर्याला यामुळे धोका आहे. कीव्हमधील शिखर बैठकीदरम्यान, किशिदा आणि झेलेन्स्की यांनी जपान आणि युक्रेनमधील द्विपक्षीय सहकार्य वाढवून आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये सुधारण्याचा निर्णय घेतला.

रशियाच्या अंदाधुंद हल्ल्यांचा निषेध

युक्रेनियन प्रदेश बेकायदेशीरपणे जोडण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना मान्यता न देण्याच्या धोरणासाठी वचनबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत संयुक्त निवेदनात रशियाने युद्ध ताबडतोब संपवावे आणि युक्रेनच्या संपूर्ण भूभागातून सर्व सैन्य बिनशर्त मागे घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, नेत्यांनी रशियाच्या अंदाधुंद हल्ल्यांचाही तीव्र निषेध केला आहे.

किशिदा पोलंडलाही भेट देणार

युक्रेननंतर किशिदा पोलंडला भेट देणार आहेत. ते तेथील नेत्यांसोबत शिखर परिषद घेणार आहेत. यामध्ये ते युक्रेनवरील रशियन आक्रमणावर चर्चा करतील आणि द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा