संदीप वाकचौरे

संगमनेर : महाराष्ट्रात विविध प्रकारची गुन्हेगारी उंचावली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील महिला व बालकांच्या गुन्हेगारीत वरचा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य विरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे.

भारतातील महिलांवरील अत्याचारातील गुन्ह्याची संख्या चार लाख 28 हजार 278 असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 39 हजार 526 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा ठरला आहे. देशातील बालगुन्हेगारीचा आलेख पाहता एक लाख 49 हजार 4004 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यातील महाराष्ट्रात 17 हजार 261 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बाल अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. भारतातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार करता एकूण 60 लाख 96 हजार 310 गुन्ह्याची नोंद झाली असून त्यातील महाराष्ट्रामध्ये पाच लाख 40 हजार 800 इतक्या गुणांची नोंद झाली आहे. देशात गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहेत. सरासरीत तामिळनाडू प्रथम क्रमांकावर, गुजरात द्वितीय व उत्तर प्रदेश तृतीय क्रमांकावरती आहे. उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याचे या अहलावरून समोर आले आहे.

भारतामध्ये एका वर्षात 30 हजार 132 खुन्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यातील महाराष्ट्रात 2 हजार 381 खुनांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावरती आहेत. मानवी शरीरावर परिणाम करणार्‍या गुन्ह्यांचा विचार करता महाराष्ट्रात एक लाख 577 गुन्हे घडले आहेत. संपत्तीविषयक गुन्ह्यांचा विचार करता महाराष्ट्रात 91 हजार 842 इतके गुन्हे घडले असून, या संघर्षात महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकावर आहे. सरासरी हे शेकडा प्रमाण 12% आहेत.
अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर झालेल्या अत्याचाराचे प्रमाण महाराष्ट्रात 2हजार 503 इतके असून सरासरी शेकडा प्रमाण 5% इतके आहे. अनुसूचित जमातीवरील अत्याचारात देशात आठ हजार आठशे दोन गुन्हे दाखल झाले असून त्यातील 628 गुणांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेता 6 हजार 190 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले असून हे सरासरी प्रमाण 24% आहे. ज्येष्ठांच्या अत्याचारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. आर्थिक गुन्हेगारीचा विचार करता महाराष्ट्रात 1हजार 550 गुन्हे दाखल झाले असून, देशातील सरासरीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहे. आर्थिक गुन्ह्यात महाराष्ट्रात प्रमाण नऊ टक्के इतके आहे. देशात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद राजस्थानमध्ये करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार व गैरकारभार यासंबंधी 3हजार 725 गुन्ह्याची नोंद झाली असून त्यातील महाराष्ट्रात 773 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. देशातील एकूण गुन्हेगारीचा विचार करता महाराष्ट्राचे हे प्रमाण सुमारे 21 टक्के इतके आहे. भारतात सायबर क्राईममध्ये 52 हजार 974 गुणाची नोंद करण्यात आली असून त्यातील महाराष्ट्रामध्ये पाच हजार 562 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण सुमारे दहा दशांश पन्नास टक्के आहे. सायबर क्राईममध्ये तेलंगणा, उत्तर प्रदेश व कर्नाटक हे प्रदेश आघाडी वरती आहेत. राज्याविरोधात कारवाईमध्ये भारतातील एकूण पाच हजार 164 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात केवळ 218 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकारात उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम व जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल हे राज्य महाराष्ट्र यापेक्षा आघाडीवर आहेत.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

कधी एकेकाळी महाराष्ट्राची ओळख प्रगत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र अशी होती. त्या महाराष्ट्राची ओळख आता हळूहळू पुसत चालली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार ज्येष्ठांवरील अत्याचारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संपत्तीवरील वादातील गुन्हे प्रकारात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराचे महाराष्ट्रात प्रमाण अधिक राहिले आहेत. भ्रष्टाचार व गैरव्यवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाढते गुन्हेगारी लक्षात घेता अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहेत. काही वर्ष महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असल्याने समाजामध्ये अस्वस्थता वाढत असल्याचेही चित्र आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा