कॅलिफोर्नियाच्या खगोल संशोधकांचे मत
नवी दिल्ली : पृथ्वीबाहेरच्या जीवनाबद्दल नागरिकांना, संशोधकांना मोठी उत्सुकता आहे. आपल्या सौरमालेबाहेरील कोणत्या तरी ग्रहावर जीवसृष्टी असावी, असा त्यांचा अंदाज आहे. अर्थात लाखो प्रकाशवर्षे दूर एखाद्या ग्रहावर ती असू शकते; परंतु त्यासाठी पोषक अशा वातावरणाची गरज आहे. त्या ग्रहाच्या काळोख्या जागी जीवसृष्टी असेल, असे मत संशोधकांनी एका अभ्यासात व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आईरव्हीनच्या खगोलशास्त्रज्ञांचा दावा आहे की, गृहाचे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग असतात. जेथे प्रखर सूर्यप्रकाश पडतो तो भाग प्रकाशित आणि जेथे तो पडत नाही, तो अप्रकाशित असतो. त्यामुळे गृह दोन भागांत विभागला जातो. प्रकाशित आणि अप्रकाशित भागांना जोडणारी सामाईक रेषेच्या परिसरातील भागात (शास्त्रीय भाषेत टर्मिनेटर झोन) जीवसृष्टी असावी, असा अंदाज वर्तवला आहे. कारण या रेषेवरील तापमान अति उष्ण आणि थंड यापेक्षा सर्वसाधारण प्रकारात मोडते. एखादा ग्रह त्याच्या तार्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तेव्हा एक भाग प्रकाशित असतो आणि दुसरा अप्रकाशित असतो; परतु दोन्ही भागांना विभागणार्या रेषेच्या परिसराचा अभ्यास केला. त्या परिसरात पोषक वातावरणामुळे जीवसृष्टी असावी, असा अंदाज संशोधकांना वाटतो.
काही ग्रहांवर कायमस्वरुपी दिवस आणि रात्र असते. संभाव्य जीवसृष्टीसंदभांतील संशोधन अॅस्ट्रोफिजीकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अॅना लोबो यांनी सांगितले की, आकाशगंगेत 70 टक्के असे तारे आणि त्यांचे ग्रह दिसतात. त्यांचे तारे आपल्या सूर्यापेक्षा कमी प्रकाशमान असतात. त्यांना एम बटू तारे असे संबोधले जाते. योग्य तपमान आणि पाणी असलेल्या ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता अधिक असते. पाणी जीवसृष्टीच्या उगमाचे प्रमुख केंद्र असते. उष्ण तपमान असलेला भाग जीवसृष्टीसाठी पोषक नसते. अतिशीत भाग बर्फाने अच्छाादित असतो. तेथे रात्र असते. पर्यायाने हिमनद्या विपुल असतात. एखाद्या ग्रहाचा पाणथळ भाग तार्यासमोर असेल तर तेथे पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते. त्यामुळे त्या भागात वाफेचे थर जमतात; परंतु दुसर्या भागात असे वातावरण नसते. प्रकाशित अणि अप्रकाशित भागातील मधला भाग तसा मोठा असतो. तेथे जमीनही मोठी असते. तेथे जीवसृष्टी निर्माण होण्याचा आणि तिच्यासाठी पोषक वातावरण असते, असा दावा केला आहे.