नवी दिल्ली : दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत शुक्रवारी राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली. दरम्यान, सिसोदिया यांना त्यांच्या कुटुंबाच्या आणि पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी अनुक्रमे 40 आणि 45 हजारांच्या धनादेशावर स्वाक्षरीची न्यायालयाने परवानगी दिली. सिसोदियांना सुनावलेल्या कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे त्यांना विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने सिसोदिया यांच्या कोठडीत 22 मार्चपर्यंत वाढ केली. ईडीने सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा