न्यूयॉर्क : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक नुकतीच दिवाळखोरीत गेली होती. त्या पार्श्‍वभूमीवर फर्स्ट रिपब्लिक बँकेला अशाच संकटातून वाचविण्यासाठी सुमारे 11 बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत 30 अब्ज डॉलर्सचे पॅकेज बँकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. रिपब्लिकन बँकेची अवस्थाही सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणे झाली आहे. शुक्रवारी ठेवीदारांनी बँकेतून 40 अब्ज डॉलर्स एका तासात काढून घेतले. बँकेत 31 डिंसेबर अखेर 176.4 अब्ज डॉलर्सच्या ठेवी होत्या. बँकेतील ठेवी कमी झाल्याने बँक संकटात सापडली आहे. बँकांच्या समूहांनी सांगितले की, अन्य बँकांतील विमा नसलेल्या ठेवी काढून घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. रक्‍कमही 2 लाख 50 हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे फर्स्ट रिपब्लिक बँकेचे समभाग सोमवारी 60 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, अतिरिक्‍त निधी प्राप्‍त होणार असल्याचा खुलासा केल्यानंतर समभागाच्या दरात वाढ झाली. बँकेला आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची घोषणा झाल्यानंतर 2008 मधील आर्थिक संकटांची आठवणीला उजाळा मिळाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा