नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोल केले जात असून ते खेदजनक असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. यामागे सत्ताधारी भाजप असल्याचा आरोप करतानाच जे कोणी ट्रोल करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस खासदार विवेक के तन्खा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी सुरू आहे. जवळपास नऊ महिन्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. घटनापीठाने निकाल राखून ठेवला असून मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनापीठातील न्यायाधीश एम.आर. शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा