इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात या वर्षातील पहिला पोलिओचा रुग्ण आढळला. बन्नू जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलाला पोलिओ झाल्याचे उघड झाले.

पाकिस्तान पोलिओमुक्‍त करण्याची मोहीम राबविली जात आहे. दुसरीकडे यासाठी फ्रान्सची आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे शिष्टमंडळ पाकिस्तान दौर्‍यावर येण्यापूर्वी ही बाब उघड झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला पोलिओपासून मुक्‍ती देण्याचा त्यांचा खटाटोप असताना रुग्ण आढळल्याने सरकारची पंचायत झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा