विजय चव्हाण

मुंबई : राज्यात मागील दोन वर्षांत रस्ते अपघातात 28 हजार 411 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 13 हजार 528 तर 2022 मध्ये 14 हजार 883 जणांचा बळी गेला. राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार काय उपाय योजना करत आहेत? असा प्रश्न प्रश्नोत्तर काळात उपस्थित केला. यावर रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार व्यापक उपाययोजना करत असल्याचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिखित स्वरूपात दिले.

उत्तरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. राज्यातील 1004 ‘ब्लॅक स्पॉट’ची माहिती घेऊन अपघातांचे विश्‍लेषण करून त्या ठिकाणी कमीत कमी कालावधीत उपाययोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा