पारखू नको ना !
विचार मंथन करू किती
सगुण-निर्गुण पेच सुटेना
साकार की निराकार मिति
संदिग्धतेची द्विधा मिटेना…
डोळे मिटुनी रूप पाहता
दिसशी कान्हा तू रांगता
निरागसतेचा तिथे वास ना!….
नाम-स्मरणे कुठे शोधू?
हवा,पाणी अन अनिलही तू
तेजकिरण दावितील मार्ग ना?..
अंतरी साक्षी तूच हरी ना
श्वासातून भेटसी निर्गुणा
क्षमता मम पारखू नको ना….
- कविता मेहेंदळे
काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसर्याच्या मनाचा विचार करून जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच मिळतं जे दुसर्याच्या मनाचा विचार करून जगत असतात…
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
घरी आल्यावर मी सहज म्हणालो,
नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही.
ताबडतोब, आतून हिचा आवाज आला, हो, कौतुक तिचे.
आम्ही साधे काही बोललो तरी तुम्हाला टोचते!