नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याकडे याबाबतची नोटीस दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 9 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांनी गांधी कुटुंबाला नेहरु यांचे नाव वापरण्यास का घाबरता? असा सवाल सभागृहात केला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करताना वेणुगोपाल यांनी नियम 188 च्या नियम 188 अंतर्गत हा प्रस्ताव दाखल केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा