पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर शुक्रवारी सक्तवसूली संचालनलयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकले. या बांधकाम व्यावसायिकाच्या कल्याणीनगर येथील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. र्ईडीच्या पथकाकडून बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हडपसर परिसरातील महंमदवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाकडून बांधण्यात आलेल्या सोसायटीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

ईडीच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत बांधकाम व्यावसायिकाची चौकशी सुरू होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा