वुहानमधील श्‍वानांचे नमुने जुळल्याने दाव्याला बळ

न्यूयॉर्क : चीनमध्ये रेकॉन जातींच्या कुत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या जनुकीय नमुन्यांची आणि वुहान शहरातील समुद्र खाद्य बाजारातील नमुने यांची तपासणी केली. तेव्हा दोन्ही नमुने एकमेकाशी जुळल्याने वुहान हा कोरोना प्रसाराचा केंद्रबिंदू असल्याच्या दाव्याला बळ मिळत आहे.

चीनमधील वुहान शहरातील समुद्र खाद्य बाजारातून ते नमुने गोळा केले होते. त्या नमुन्यातील विषाणू आणि कुत्र्यांच्या शरीरातील नमुन्यातील विषाणूशी ते तंतोतंत जुळले. तसेच हा विषाणू कोरोनाचाच होता, असे सिद्ध झाल्याचा दावा केला आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या चमूने या संदर्भातील संशोधन केले. त्यामुळे वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाला. तसेच वुहान हेच कोराना विषाणूचे केंद्र होते, या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने गुरूवारी दिले. वुहान शहरातील हुनान समुद्रखाद्य बाजारातील जनुकीय नमुने जानेवारी 2020 मध्ये गोळा केले होते; परंतु कोरोनाचा उद्रेक पुन्हा होईल, या भीतीने नंतर हा बाजार चीनने बंद केला होता. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या गुप्‍तचर विभागाने वुहान येथील प्रयोगशाळेत झालेल्या एखाद्या दुर्घटनेमुळे कोरोनाचा विषाणू प्रसारीत झाला असावा. त्यामुळे संसर्गजन्य आजाराची साथ पसरली असावी, असे नवे संशोधन झाल्याचा दावा केला होता. बाजारातून प्राणी बाहेर काढण्यात आले. तेव्हा संशोधकांनी भिंती, जमीन, लोखंडी पिंजरे आणि बैलगाडीच्या परिसरातील लाळेचे नमुने गोळा केले होते. त्यांचा वापर प्रामुख्याने प्राण्यांच्या वाहतुकीसाठी केला जात होता. त्यांची तपासणी केली तेव्हा त्यात कोरोनाचे विषाणू आढळले होते. विशेष म्हणजे प्राण्यांतील नमुने आणि रेकॉन जातीच्या कुत्र्यांतील विषाणू एकमेकाशी जुळत असल्याचे अर्थात ते कोरोनाचेच असल्याचा संशोधनात उघड झाल्याने वुहान हा कोरोनाचा उद्रेकाचा केंद्रबिंदू असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचा दावा केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा