नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या आणखी पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने हैदराबादमधील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे. शेख रहीम उर्फ अब्दुल रहीम, शेख वहैद अली उर्फ अब्दुल वाहेद अली, जाफरुल्ला खान पठाण, शेख रियाझ अहमद आणि अब्दुल वारिस अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर मुस्लिम तरुणांना भडकावणे, कट्टरपंथी बनवणे, पीएफआयमध्ये भरती करणे, पीएफआयच्या प्रशिक्षण शिबिरात शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे आदी आरोप आहेत. 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या कटाला पुढे नेण्यासाठी हिंसक दहशतवादी कारवाया करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा