जयपूर : राजस्तानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लॉरेन्स बिश्‍नोई टोळीच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सोनू, सचिन, आणि हरिश अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते पंजाबचे रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही टोळी प्रसिध्द व्यापारी हरकचंद मालपाणी यांच्याकडून पैसे उकळण्याच्या तयारीत होती. मालपाणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी त्यांच्याकडे कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई याचा भाऊ अनमोल बिश्‍नोई याच्या नावाने धमकावून पैश्याची मागणी करत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा